हवामान / वातावरण /उष्माघाताचा अलर्ट/उष्णतेची लाट
मुंबई- येता आठवडा राज्यात मोठ्या प्रमाणात उष्ण तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अति सावधतेचा इशारा मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिउष्ण व दमट वातावरणामुळे उष्माघाताचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान रविवारी राज्यातील बहुतेक शहरांचे कमालतापाने 41 पेक्षा अधिक होते. वाशिम शहराचा पारा राज्यात सर्वाधिक 43 अंशावर पोहोचलेला आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे कमालतापमान ४१ अंशापर्यंत राहू शकते. महाराष्ट्रातील अनेक शहरांचा तापमान 41 ते 42 अंशापर्यंत तप्त झाले आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही शहराचे तापमान रविवारी 43 अंशापर्यंत नोंदले गेले होते.
उष्णतेची लाट-
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार गुजरात मधील वाळवंटी प्रदेशातून महाराष्ट्रात यावेळेस सतत अति उष्ण वारे येत आहेत परिणामी कोकण उत्तर व मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होत आहे त्यामुळे ठाणे रायगड पालघर मुंबई सिंधुदुर्ग रत्नागिरी आदी शहरात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईचे कमान तापमान 40° मागील दोन आठवड्याच्या फरकामध्ये मुंबई उष्णतेची दुसरी लाट आली आहे कालच्या रविवारी प्रमाणेच सोमवारी ही 29 एप्रिल 12:40 पर्यंत असेल मात्र कालच्या तृनेत आज 28 38 असतात त्यात घट होऊ शकते मंगळवारपासून किमान तापमान सत्ता स्थिर राहणार असले तरी किमान तापमानात दिवसागणित एक अंशाने घट होईल असा अंदाज सांताक्रुज वेधशाळेने वर्तविला आहे.
🔺 अतिउच्च तापमानात घ्यावयाची काळजी.
या कालावधीत आरोग्याची काळजी महत्वाची असून जास्त वेळ उन्हात एकाच जागे थांबू नये. या काळात भरपूर पाणी प्या, हलके सुती कपडे वापरा। दुपारी एक ते चार पर्यंत शरीर थंड ठेवा. यावेळी डोकेदुखी हाता पायात गोळे येणे, खूप थकवा चक्कर आल्यास डॉक्टरांना दाखवा.
रविवारी राज्यातील तापमान खालील प्रमाणे होते आशिम 43 पुणे 41 मुंबई ते 30 अहमदनगर 40 जळगाव 41.5 महाबळेश्वर 32.9 कोल्हापूर 38.7 मालेगाव 42 नाशिक 40.1 सांगली 40.5 सातारा 39.1 सोलापूर 42 अंश छत्रपती संभाजी नगर 39.2 नांदेड 42.4 परभणी 41.5 बीड 41.2 अकोला 41.4 अमरावती 40 चंद्रपूर 42.8 सेल्सिअस गोंदिया 37.6 नागपूर 39.7 वाशीम 43 आणि वर्धा 41.4 असं नोंद झाली आहे