धर्मशील समाज निर्मितीसाठी उपनयन संस्कार – भागवतमर्मज्ञ ह. भ.प. बाळुमहाराज उखळीकर
धर्मसंस्कार जीवनाचा पाया : अविरत ४४वर्षांचा ब्राह्मण सभेचा उपक्रम कौतुकास्पद- खा.डॉ. प्रीतमताई मुंडे
बीड/परळी वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क –
धर्माचरणाचे संस्कार हे उपनयना सारख्या संस्कारातून होते. त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत आहेत. अध्यात्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. देव, देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात असे प्रतिपादन प्रसिद्ध भागवताचार्य, कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांनी केले. ब्राह्मण बहुद्देशीय सभा आयोजित शानदार सोहळ्यात विविध ठिकाणच्या २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले.
ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४ ४ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २९ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात २१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती लाभली. गेल्या ४३ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो. शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ११.१२ वा. दर्शन मंडप वैद्यनाथ मंदिर परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपुर्वक संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले.या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या २१ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध भागवताचार्य,कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे अशिर्वचन झाले. त्याचबरोबर धर्मसंस्कार जीवनाचा पाया असुन हे संस्कार करणारा ब्राह्मण सभेचा उपक्रम अविरत ४४ वर्षांपासुन सुरु ठेवणे हे कौतुकास्पद असुन परळीतील सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याच्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या या परंपरेत मला उपस्थित राहता आले हे आनंददायी असल्याची भावना खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. जि.प. गटनेते अजय मुंडे यांनीही या उपक्रमाला दरवर्षी उपस्थित राहत असतो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.सकाळी मातृका पुजनानंतर सर्व बटूंची प्रभू वैद्यनाथ मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात आली. सनई चौघडा, मंत्रोच्चार व समाज बांधवांची मोठी उपस्थिती यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला होता. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध भागवताचार्य,कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर , बीडच्या विद्यमान खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, जि.प.गटनेते अजय मुंडे, वैद्यनाथ देवस्थानचे सचिव प्रा.बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, भाजप जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डुबे, भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हा.चेअरमन रमेश कराड, दीनदयाळ बॅकेंचे व्हा.चेअरमन ॲड.राजेश्वर देशमुख, संदीप लाहोटी, महेशअप्पा निर्मळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ब्राह्मण बहुद्देशीय सभेचे अध्यक्ष शरदराव कुलकर्णी, सचिव प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष वासुदेव पाठक, जेष्ठ नेते श्रीकांत मांडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अरुणराव पुराणिक, नितीन कुलकर्णी, अजय जोशी, सचिन जोशी,चारुदत्त करमाळकर, जितेंद्र नव्हाडे, गिरिश प्रयाग, रत्नाकर कुलकर्णी, विश्वांभर कुलकर्णी, दिपक जोशी, दिनेश लोंढे,ऋषी पौळ, अनंत कुलकर्णी, प्रशांत रामदासी आदींनी मान्यवरांचा सत्कार केला.
समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र जोशी यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी. दा.सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन, ब्राह्मण महिला आघाडी, ब्राह्मण युवक संघटना,पुरोहित संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
