🔺 बीड – गावकऱ्यांची भावना मंतदाना कडे दुर्लक्ष 🔺 जिल्ह्यातील 25 वर्षापासून पाण्याचा प्रश्न, ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून ही लटकला 🔺सर्वच राजकीय पक्ष/नेते यांनी मतदानपूर्ते झुलवले हेच मोठ दुर्दैव.
बीड/केज/ एम एन सी न्यूज नेटवर्क – तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावाचा प्रश्न मागील २५ वर्षांपासून प्रचित आहे. त्याची दखल राजकीय पक्ष व प्रशासनाने घेतली नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांनो लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले आहे. आमचा प्रश्न सोडवण्याकडे आतापर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने उदासिनता दाखवली त्यामुळे आम्हीही आता मतदानाकडे उदासिनता दाखवू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे २ हजार ३०० मतदान असून या गावातील साठवण तलावाच्या कामाचा सर्वे होउन २५ वर्ष लोटले आहेत, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आज ना उद्या आपल्या गावाला पाण्याचा शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होईल अशी ग्रामस्थांचे अपेक्षा होती मात्र वर्षामागून वर्ष गेली तरीही कोरडेवाडीचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटलेला नाही. ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही काम मार्गी लागण्यासाठी अद्याप पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी अथवा नेत्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.
डोंगरी भागात असलेल्या या गावाला शेतीला पाणी नसल्याने नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नसल्याने मुलांना पाहिजे तसे शिक्षण देता येत नाही, उदरनिर्वाह करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. होणाऱ्या निवडणुकावर बहिष्कार घालण्यास निर्णय सरपंच नंदू बाई कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ग्रामस्थांनी घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाकडून प्रशासनाकडून कोणत्या हालचाली होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबतचे निवेदन युवा नेते दत्ता कोरडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव शिवाजी कोरडे गोविंद राख प्रमोद कोरडे यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षकांना दिले आहेत आमचा वापर केवळ निवडणुकात मतदानासाठी करून घेतला जातो मात्र आमचे प्रश्न प्रलंबित ठेवले जातात असा आरोप ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केला आहे
पाणी नसल्याने त्रस्त, आमचा नाईलाज आहे
गेला काही वर्षात विद्यमान खासदारांना आमच्या गावाने लीड दिली. यासह प्रत्येक निवडणूकीत आमच्या गावातील लोकांचा हिरीरीने सहभाग असतो. निवडणूक आली की लोक येतात.आश्वासने देतात. मात्र, आमच्या गावच्या तलावाचा प्रश्न काही सुटला नाही. कोरडेवाडी गावात साठवण तालाव मंजूर करण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा
लागतो, हे अतिशय दुर्दैव आहे, असे माजी सरपंच सतीश दुनघव यांनी सांगितले