दहावी-बारावीचा निकाल मे महिना अखेर

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

पुणे : दहावी परीक्षेच्या सुमारास निवडणूक आचार संहितालागू झाली होती.  दरम्यान निवडणूक प्रक्रियात अनेक शिक्षक कर्मचऱ्याना कामे करावी लागली . परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे पूर्णत्वास नेली आहे . गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमाणा दिली.

दहावी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली या निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजावावी लागली. या स्थितीत अधिकारी, शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले, असे गोसावी म्हणाले.