PC Googal Maps
🔺राज्यातील पहिले मातीचे धरण 🔺 पाणीसाठा क्षेत्रफळ : २२.८६ वर्ग कि. मी.
🔷 जिल्ह्यातील लघु ,मध्यम सुमारे २६७ प्रकल्पांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट. 🔺१५ जूनपर्यंत ही मोहीम राबविली जाणार.
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे त्र्यंबकेश्वरला उगम पावणाऱ्या गोदावरी नदीवर असून धरणाची म्हणजे मातीच्या भरावाची सुमारे उंची ४४.२० मीटर आहे.
नाशिक : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन व समृद्ध नाशिक फाउंडेशन आदिच्या सहभागातून समृद्ध नाशिक अभियान – २०२४ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत गत कशी गत काही दिवसात सुमारे 20 हजार क्युबिक मीटर गाळाचा उपसा झाला असून, त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मुख्य सहभागासह भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन व समृद्ध नाशिक फाउंडेशन यांच्या नुकतेच गंगावरहे गावालगत गंगापूर धरणातून ३ पोकलेन मशीनच्या सहाय्याने १२८ हायवा ट्रक व २९ ट्रॅक्टर सुपीक गाळ काढला गेला. परिसरातील शेतकऱ्यांनी तो वाहून नेला. पंधराशे क्युबिक मीटर गाळाचा उपसा दिवसभरात होत आहे लाखो लिटर जलसाठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. १५ जूनपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मशीन/वाहने लागणार आहे .
या सोबतच नाशिक जिल्हा परिषद, मालेगाव पाटबंधारे जलसंधारण विभागाने यांनी देखील १३१ बंधाऱ्यांमधून ५.२४ लाख घनमीटर व पाच सिंचन प्रकल्पांमधून २.२३ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. एकूणच जिल्ह्यातील लहान मोठ्या २६७ प्रकल्पांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट असल्याने आगामी पाऊस काळात पाणी साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.