महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ परळी काँग्रेस पार्टीची आघाडी

३९ लोकसभा निवडणूक-

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय निश्चित-बहादुरभाई

परळी -महाविकास आघाडीचे अधिकृत बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाने शहरात प्रचार फेरी काढत विविध भागात आघाडी घेतली असुन मतदारांचा एकच निश्चय महाविकास आघाडी विजय असा संकल्प केला असल्याचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी प्रचार रँली दरम्यान केले आहे.

गेली 24 एप्रिल पासून काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सह परळी शहर पिंजुन काढले आहे.शहरातील नूर मस्जिद, फुले नगर,सिद्धार्थ नगर,आझाद नगर, मिलिंद नगर,जुने रेल्वे स्टेशन,भिमनगर,पद्मावतीगल्ली,कृष्णा नगर,गंगा सागर नगर, सावता माळी नगर, साठे नगर, बंगला, गणेशपार परिसर, देशमुख गल्ली, धनगर गल्ली, चोंडे गल्ली, गवळी गल्ली अंबेवेस. गणेशपर इत्यादी भागात प्रचार फेरी काढत महाविकास आघाडीच्या बजरंग बप्पा सोनवणे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतिने या प्रचार फेरीचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले.
या प्रचार फेरीत काँग्रेसचे कार्यअध्यक्ष शशी चौधरी,उपाध्यक्ष इतेशाम खतिब, सुभाष देशमुख, वैजनाथ गडेकर,सर चिटणीस शिवाजी देशमुख, कोषाध्यक्ष फरकुंद अली भाई,जेष्ठ नेते गुलाबराव देवकर,समंदर खान, प्रवक्ते बद्दर भाई, सितम भाई विधान परिषद युवक अध्यक्ष रणजित देशमुख शहर अध्यक्ष अलीम भाई, कार्य अध्यक्ष वाळवे, बबलू उर्फ फारुख काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सद्दाम भाई, शहर अध्यक्ष रसूल खान, ओबीसी अध्यक्ष जावेद भाई अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष दीपक शिरसाट, युनूस भाई,शेख बाबा,शेख मोईन नवाब, अख्तर हुसेन, इत्यादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शहर पिंजुन काढत प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा एकच निश्चय महाविकास आघाडीचे अधिकृत बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतानी दिल्लीत पाठवणार असल्याचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी सांगितले आहे.