
लोकसभा निवडणूक -२०२४
बारामती व इंदापूर तालुक्यातील विविध गावांत झाल्या जोरदार सभा
बारामती- देशाचे कृषीमंत्री असताना शरदचंद्र पवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना पुसण्याचे काम केले. तब्बल 72 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी माफ केले. महाराष्ट्रामध्ये विविध विकास योजना आणल्या, राज्याला विकासाच्या महामार्गावर आणण्याचे काम त्यांनी केले. मोदी-शहांसारख्या हुकूमशाही सत्तेच्या विरोधात लढताना ते अपराजित योद्धा प्रमाणे आजही लढत आहेत. बारामती मतदारसंघात सुप्रियाताई निवडून नक्की येणार आहेत. अजित दादा पवार यांच्या दडपशाहीला या मतदारसंघातील जनता कंटाळली असून मोदी-शहा यांचा कुटील कावा मतदारांनी ओळखला आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने सुप्रियाताई सुळे बारामती मतदारसंघाच्या खासदार होतील असा विश्वास ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तथा महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या झंझावाती सभा झाल्या. इंदापूर व बारामती तालुक्यांमधील विविध गावात जाऊन फुलचंद कराड यांनी मतदारांशी गाठीभेटी घेऊन संवाद साधला. सुप्रियाताई सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास आपल्याला वाटत असून बारामती मतदारसंघातील मतदार शरदपवार साहेब व सुप्रियाताई यांच्या पाठीशी असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.
देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सुप्रियाताई सुळे यांनी ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांना बारामती मतदारसंघात प्रचारासाठी निमंत्रित केले होते. त्यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत तातडीने फुलचंद कराड यांनी बारामती मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला. मतदारसंघातील बारामती व इंदापूर अशा दोन तालुक्यांमधील विविध गावात जाऊन तेथील मतदारांशी संवाद साधला असून देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले.
बारामती मतदारसंघातील असणाऱ्या भोडणी, लाखेवाडी, मोडणी, रेडणी, खाडे वस्ती, रुई, वंजारवाडी,अकोले, निर्गुडी,लाकडी, कळस, लिंबोडी आदी गावांत जोरदार प्रचार सभा झाल्या. यावेळी ज्येष्ठ नेते फुलचंद भाऊ कराड यांच्या समवेत विजय आंधळे, रणजीत पवार, विलास हंगे, नानासाहेब हंगे, संतोष हांगे, सुनील खांडे, जयकुमार काळे, काशिनाथ दराडे, पोपटराव चौधरी, अमोल मुळे, पोलीस पाटील पडळकर यांच्यासह गावोगावीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. फुलचंद कराड यांचा गावोगावी भव्य सत्कार करण्यात आला.

