दिव्यांग मतदार जनजागृती फेरी

छायाचित्र-दिव्यांग मतदार जनजागृती अभियानात दिव्यांग नागरिक, मुख्याध्यापक , विशेष शिक्षक, शिक्षकेत्तर आदींनी सहभाग घेतला.

३९ लोकसभा निवडणूक -२०२४ / मतदार जागृती 

बीड/परळी-वैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क : परळी येथील गटशिक्षण कार्यालयातून सोमवारी (ता.२९) दिव्यांग मतदार जनजागृती अभियान फेरीस प्रारंभ करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी श्री . कनके सर यांनी हिरवा झेंडा दाखवून दिव्यांग मतदार जनजागृतीस प्रारंभ करण्यात आला. या मतदार जनजागृती फेरीत दिव्यांग नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यालयाने या फेरीचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी जवळगाव रोड भारज पाटी येथील ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय, धानोरा येथील सेवा मतिमंद कार्यशाळा, अंबाजोगाई येथील मानव विकास मूकबधिर विद्यालयातील मुख्याध्यापक , विशेष शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता.