३९ -लोकसभा २०२४ निवडणूक / निवडणूक आयोग
बीड, दि.30: (जिमाका) निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी रात्री शासकीय तंत्रविद्या निकेतन (गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक) येथे निवडणुकीनंतर ठेवण्यात येणाऱ्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीन्स ची तसेच 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी निमित्त केलेल्या तयारीची पाहणी केली.
शासकीय तंत्रविद्या निकेतन येथे निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील मतदान मशीन ठेवण्यात येणार असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम होत आहे. या कामाचा आढावा यावेळी श्री हक यांनी घेतला.
सीसीटीव्ही, कॅमेरा कंट्रोल रूम, मीडिया सेल, मतमोजणीची ठिकाण, मतमोजणी झाल्यावर राजकीय पक्षांना तसेच माध्यमांना देण्यात येणारी माहिती चे केलेले नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत सुविधा याबाबत संबंधित यंत्रणेला विचारणा केली. पुढील पाहणी 7 मे ला करण्यात येणार असून त्यापूर्वी सर्व कामे व्हावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासह त्यांनी वखार महामंडळातील गोदामात ठेवलेल्या मतदान मशीनची सीसीटीव्ही च्या माध्यमातून पहाणी केली. तसेच या परिसराचा दौरा केला.

