सोलापूर स्वकुळ साळी ज्ञाति बांधव आयोजित उपनयन संस्कार सोहळा;१०२ बटूंचा सहभाग

🔺धार्मिक, अध्यात्मिक, उपनयन संस्कार, सामाजिक उपक्रम 

🔶 श्री जिव्हेश्वर मंडळाच्या वतीने स्वकुळसाळी समाजातील ७ ते १४ वयोगटातील मुलांचें उपनयन संस्कार

सोलापूर-  सोमवार (दि २९) एप्रिल, २०२४ रोजी अर्थात चैत्र वद्य पंचमीच्या महापर्वावर स्वकुळ साळी ज्ञाति बांधव सोलापूर संचलित श्री जिव्हेश्वर मंडळाच्या वतीने स्वकुळसाळी समाजातील वयवर्षे ७ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचा उपनयन संस्कार सोहळा परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींच्या दिव्यसनिध्यात सोलापुरातील लक्ष्मी नारायण टॉकीजजवळील सत्यविजय कनव्हेंशन मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केला होता. जवळपास १०२ बटूंनी संस्कार सोहळ्यात सहभाग नोंदवला.

परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींनी उपस्थित बटूंना गायत्री मंत्राचा उपदेश तत् संबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी साधक समाज बांधव श्री. गोवर्धन पिसे यांच्या हस्ते परमपूज्य श्रीगुरुदेवांचे स्वागत आणि सत्कार समस्त समाज, मंडळ, मंडळाचे पदाधिकारी आणि अध्यक्ष श्री. उमेश गायकवाड यांच्या वतीने केला. श्रीमान साधक मल्लिनाथ तमशेट्टी परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा एक सुबोध परिचय उपस्थित समाज बांधवांना करून दिला. या प्रसंगी स्वकुळ साळी समाजातील स्त्री-पुरुष, उपनयन करून घेणाऱ्या मुलांचे आईवडील आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळीं सुद्धा मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होती. सकाळी ७ वाजता सुरु झालेला उपनयन संस्कार दुपारी १ वाजेपर्यंत सुरु होता.

अशा प्रकारचा नयनरम्य वैदिक उपनयन संस्कार सोहळा स्वकुळ साळी ज्ञाति बांधवाच्या वतीने आयोजित केला जाणारा तो एक अभिनव उपक्रम आहे असे म्हणावे लागेल. हा कार्यक्रम अत्यंत श्रध्दामय आणि शिस्तबद्ध वातावरणामध्ये संपन्न करण्यासाठी स्वकुळ साळी ज्ञाति बांधवांनी, स्वयंसेवकांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले.