परळी तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

🔶 सौ. शुभांगी जातकर -बुरकुले यांच्या मतदान जागृती रांगोळीने वेधले लक्ष

बीड/परळी वैजनाथ – एम एन सी न्यूज नेटवर्क-  महाराष्ट्र दिनानिमित्त आज परळी तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. दरम्यान 39 लोकसभा निवडणूक 2024 वातावरण सर्वत्र आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम ही जोरदार सुरू आहे. मतदार जागृतीसाठी एक चांगला संदेश देणारी सुंदरशी रांगोळी परळी तहसील प्रांगणात साकारण्यात आली.

एकूणच देशभरात निवडणुकांची धामधूम चालू आहे, मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या, प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम ही यावेळेस करण्यात आली. मानवी साखळी आणि मतदान करूयात अशी शपथ ही उपस्थिती त्यांना देण्यात आली. दरम्यान तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ध्वजारोहण केले. या सर्व  कार्यक्रमात ध्वज स्तंभाजवळ चित्ताकर्षक अशी लक्ष वेधून घेणारी मतदान जागृतीच्या संदेश देणारी रांगोळी साकारण्यात आली होती.  सदरची रांगोळी जलसंपदा विभागात अंबाजोगाई येथे कार्यरत असलेल्या सौ. शुभांगी नंदकिशोर जातकर (बुरकुले) यांनी साकारल्याची माहिती मिळाली.

🔺माझे मत माझा अधिकार..
गरज आहे काळाची, ओळखा ताकद मतदानाची

महाराष्ट्र न्यूज कनेक्ट च्या प्रतिनिधींनी सौ. शुभांगी यांची भेट घेऊन या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा त्या म्हणाल्या मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, सर्वांचा तो अधिकार आहे. सर्वांनी हा अधिकार बजवायला हवा. त्या रांगोळीत मी एक महिला दर्शविली आहे , मतदानाच्या या राष्ट्रीय कार्यात महिलांचा सहभाग ही अधिक महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. ही कल्पक अशी मतदान जागृती संदेश देणारी रांगोळी काढायला साधारणतः एक तास लागला असेही त्या म्हणाल्या.

या रांगोळीचें तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बाबुरावजी रुपनर, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख उस्मान, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या सह उपस्थित नागरिकानी सौ. शुभांगी यांच्या या कल्पक रांगोळीचे खूप कौतुक केलं.