राज्यातील सुमारे २० शहरे तप्त; अनेक  शहरांत पारा चाळिशीपार,

🔺संभाजीनगर ४०.८, जालना ४१ तर  जेऊरला उच्चांकी ४४.५, 🔺 मराठवाड्यात २ अंश वाढणार तापमान,

नाशिक-राज्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून काही  शहरांतील पारा कालच्या मंगळवारी ४० च्या वर  गेला होता. राज्यातील उच्चांकी तापमान सोलापूर जवळील जेऊरला ४४.५ अंश तापमानाची नोंद झाल्याच दिसून आली. पुढील काही दिवस नागरिकांना दिवसा उन्हाचा तर रात्री उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दिवसा प्रचंड उष्मा तर रात्रीचा उकाडा अधिक प्रमाणात आहे. एकूणच राज्यात सरासरी कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात सरासरी इतके तापमान राहणार असून कोकणात कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेचा कहर सर्वत्र वाढतो आहे.

🔺 राज्यातील काही प्रमुख शहरातील मंगळवारचे कमाल तपमानची मिळालेली माहिती अशी

अकोला ४३.९ अलिबाग ३३.९,अहमदनगर ४१.०, अमरावती ४२.८, बीड ४२.० , बारामती सोलापूर  ४४.०,  जालना ४१.० नाशिक ३९.२  मालेगाव ४३.२ जेऊर ४४.५ ,परभणी ४१.८, धाराशिव ४१.४,  सांगली ४२.४, बुलडाणा ४०.५ ,ब्रम्हपुरी ४२ .२  चंद्रपूर ४२.८,  संभाजीनगर ४०.८, गोंदिया ३९.० , जळगाव ४३.०, पुणे ४१.७ , ठाणे ४२.०, नागपूर ४१ .४ ,नांदेड ४२.२ , वाशीम ४२.४, वर्धा ४२.६ , यवतमाळ ४०.०, राज्यातील थंड हवेच ठिकाण असलेले महाबळेश्वर ३५.१