कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज विविध व्यापाऱ्यांची बैठक

बीड लोकसभा निवडणूक २०२४

शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या सर्व बांधवांनी उपस्थित रहावे-सभापती सूर्यभान मुंडे

परळी वैजनाथ / लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.02 मे रोजी व्यापारी संघटनेची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी केले आहे.
बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत विविध व्यापारी संघटनेच्या व्यापारी बांधवांची बैठक परळी येथील आर्य समाज मंदिर येथे दि. 2 मे 2024 रोज गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब व महायुतीतील घटक पक्षातील मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहे.तरी सर्व व्यापारी बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी केले आहे.