आज उद्धव ठाकरे यांची तोफ कणकवलीत धडाडणार

🔶 लोकसभा निवडणूक २०२४ /प्रचार /प्रचार सभा /🔶 कोकण विभाग 

सिंधुदुर्ग /कणकवली : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा आज शुक्रवार ३ मे रोजी सायंकाळी ६ वा. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ होत असून ते काय बोलतात या कडे राज्याचे लक्ष लागले आहे  ही सभा  कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होत  आहे. राज्यभर प्रचारसभांचा धडाका लावणारे उद्धव ठाकरे हे कणकवलीत काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या निशाणावर सातत्याने गृहमंत्री अमित शहा,पंतप्रधान नरेंद्र मोदी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या चार प्रमुख नेत्यावर जोरदार टीका ते करत आहेत त्यामुळे आजच्या कणकवली येथे  ते काय बोलतील,कोणाचा समाचार घेणार याची उत्सुकता मविआ पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनाच आहे. दरम्यान ही जाहीर सभा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे.