🔷 २ गणवेश शिलाई भत्ता पाचशे रुपये 🔷२०१९-२० साठीचे गणवेश कापड २०२४ मध्ये.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना तब्बल सहा वर्षानंतर नवीन गणवेश मिळणार आहे. सुमारे ६३ हजार कर्मचाऱ्यांना गणवेशा करिता कापड देण्यास सुरुवात झाली असून नागपूर व अमरावती विभागातील १० विभागात कर्मचाऱ्यांना दोन गणवेशाचे कापड देण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना पूर्वी गणवेशाकरिता कापड आणि शिलाई भत्ता देण्यात येत असे. परंतु २०१७ मध्ये त्यावेळचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गणवेश बदलण्याची योजना आखली होती. त्यानुसार १३ संवर्गातील सुमारे ७० हजार
कर्मचाऱ्यांना दोन तयार गणवेश दिले. परंतु या गणवेशाबाबत कर्मचारी आणि कर्मचारी संघटना यांच्याकडून प्रचंड तक्रारी आल्या. मागील दीर्घकाळ चाललेल्या रापम कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने प्रतिनिधींच्या संघटनेसोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांना गणवेशाचे कापड पुरवले जाण्याचे मान्य केले होते.
दरम्यान, एसटी महामंडळाने निर्णयानुसार पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना कापड आणि शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कर्मचाऱ्यांना वर्षाला दोन गणवेशाचे कापड देण्यात येणार आहे. एका गणवेशासाठी २५० रुपये शिलाई भत्ता याप्रमाणे पाचशे रुपये भत्ता देण्यात येणार असून २०१९-२० साठीचे गणवेश कापड २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
मिळणार
🔺 गणवेशाचे कापड कोणाला- सदर गणवेशाचे कापड मुख्यत्वे सहाय्यक वाहक अधिक्षक, वाहतूक निरीक्षक, सहा. वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, मुख्य द्वारपाल, चालक, वाहक, शिपाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, खलाशी. आदिना मिळणार.
🔺 पूर्वी ६३ कोटी, आता १५ कोटी रुपये खर्च – यापूर्वी तत्कालीन परिवहन मंत्री रावते यांनी ६३ कोटी रुपये खर्च करून तयार गणवेश दिले होते. त्यावर कामगारांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आता यावर १५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
