अभिनेते संदीप पाठक यांच्या पारिवारिक समारंभाला धनंजय मुंडे यांची उपस्थिती

🔶 धार्मिक कार्यक्रम/ उपनयन संस्कार
बीड /परळी – वैद्यनाथ/ एमएनसी न्यूज नेटवर्क–  मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचे चिरंजीव निषाद तसेच डॉ. शैलेश पाठक यांचे चिरंजीव शौनक यांचा उपनयन संस्कार सोहळा आज शहरांत पार पडला. यावेळी कृषी मंत्री तथा पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून पाठक कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.