फाउंडेशन स्कूल च्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश

🔶 शिष्यवृत्ती परीक्षा / यश /कौतुक /शिक्षण 

बीड /परळी-वैजनाथ / एम एन सी न्यूज नेटवर्क : महारष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत फाउंडेशन स्कूल च्या इ. 5वी व 8वी या वर्गांच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरत दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत ऐकून 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती करिता पात्र झाले.
शालेय विद्यार्थ्यांकरिता राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी शाळेत विशेष शिकवणी वर्ग आयोजित केले जातात. शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा पाहता, फाउंडेशन स्कूल चे विद्यार्थी नेहमी अग्रेसर राहावेत या करिता भविष्यात ही आम्ही कटिबद्ध राहू , असे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष श्री विजयप्रकाशजी तोतला यांनी केले.

विशेष शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना, यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शुभेच्छा देत, भविष्यात ही आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन शाळेचे उपाध्यक्ष श्री रविकुमार तोतला,
शैक्षणिक संचालिका डॉ. सौ. रितू तोतला, प्राचार्य श्री गजानन नागझरे व रेसोनन्स सेंटर हेड श्री संदीप यादव यांनी केले.