🔶 लोकसभा निवडणुक-२०२४/प्रचार/प्रचारसभा/
बीड/अंबाजोगाई-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभेचं नियोजन करण्यात आले असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अंबाजोगाई येथे प्रचार सभेसाठी येतं आहेत.
भारतीय जनता पार्टी कडून मराठवाड्यात मोदींच्या प्रचार सभेचे लोकसभा निवडणूक अनुषंगाने नियोजन करण्यात आले होते. यात पूर्वी लातूर, नांदेड, धाराशिव, आणि परभणी येथे पंतप्रधानांच्या प्रचार सभा झाल्या आहेत. आता त्यांची सभा अंबाजोगाई येथे उद्या मंगळवारी दिनांक ७ मे रोजी होत आहे. त्या दृष्टीने मंडप उभारणीच्या कामालाही वेग आला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची सभा अंबाजोगाई येथे मोरेवाडी नजीक, कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. उद्या दि. ७ रोजी सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या अनुषंगाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आलेला आहे. पंतप्रधानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे.