🔺लोकसभा निवडणुक २०२४/प्रचार/प्रचारसभा
पुणे -बारामती : लोकसभेच्या प्रचारासाठी सतत जाहीर सभा प्रचार रॅली, रॉड शो यामुळे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. ६) होणारे पवार यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
लोकसभेच्या निवडणूक प्रचार ,सभे साठी पवार हे राज्यभर दौरे करत आहेत.राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांनी दौरे करत जाहीर सभा घेतल्या. बारामतीत रविवारी प्रचाराची सांगता सभाही घेतली.
सातत्याने धावपळ, दगदग झाल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. त्यांचा आवाज बसला आहे. सध्या ते बारामतीतील घरीच आहेत. सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे कात्रज येथे होणारी जाहीर सभाही रद्द केल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात लोकसभा निवडणुकीसाठी शरद आले.