उस्मानाबाद आणि लातूर मध्ये आज मतदान

🔷 लोकसभा निवडणूक २०२४ 🔶 मुख्यत्वे काँग्रेस, भाजप, उद्धवसेना, राष्ट्रवादी (अ.प गट) यांच्यात लढत.

लातूर  धाराशिव-: राज्यातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या दोन मतदारसंघात आज दिनांक सात रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे मुखत्वे काँग्रेस, भाजप ,उद्धवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यात येथील लढती होणार आहेत लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे तर उस्मानाबाद मध्ये उद्धव सेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होत आहे.

🔺लातूर
एकूण उमेदवार… २८
बॅलेट युनिट… २
मतदारांची संख्या…. १९,८०,४०९
संवेदनशील मतदान केंद्रे…. १६

🔺धाराशिव
उमेदवार …… ३१
बॅलेट युनिट…. २
मतदार… १९९२७३
संवेदनशील मतदान केंद्रे…. ६

लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यात सकाळी सातच्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरू होणार असून सायंकाळी ती सहा पर्यंत चालू असेल. एकूणच मतदान प्रक्रियेवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून मोठा पोलीस फोजफाटा या दोन्ही जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे.
🔺 बंदोबस्त
दोन्ही जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ बटालियन, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बीएसएफ) यांची १ बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत.
तसेच २४२  पोलीस अधिकारी, ३७६० पोलीस अंमलदार, १८०० होमगार्ड,  बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.