पोलिसाला ट्रॅक्टर ट्रॉली खाली चिरडणाऱ्या वाळू माफियांची घरे केली जमीनदोस्त

संग्रहित छायाचित्र

🔺वाळू माफिया/ अवैध धंदे/ अवैध उत्खनन.

मध्य प्रदेश – शहडोल  : अवैध उत्खनन मग ते कुठल्याही प्रकारचे असो याच प्रशासनावर दबाव बनवण्याचा प्रयत्न सर्वच गुंड वृत्तीच्या माध्यमातून केला जातो. प्राधान्याने माफियाना अवैध्य वाळू उत्खनन अधिक पैसा मिळवून देणारा धंदा आहे. नुकतीच हार्दिक शुभेच्छा मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात अवैधरीत्या उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने एका पोलिस कर्मचाऱ्याला चिरडून ठार केले होते. या प्रकरणातील सहभागी दोन आरोपींची घरे अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली आहेत.

शहडोल पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा फरार ट्रॅक्टर-ट्रॉली मालक सुरेंद्र सिंह यालाही अटक केली, असे पोलिस अधीक्षक कुमार प्रतीक यांनी सांगितले.सुरेंद्र सिंह याचा मुलगा आशुतोष – सिंह ट्रॅक्टर चालवत होता. दुसरा वाहनचालक राज रावत त्याच्यासोबत होता. या दोघांना शनिवारी मध्यरात्री बेओहरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडोली गावात घडलेल्या घटनेच्या संदर्भात अटक करण्यात आली होती.

रविवारी ट्रॅक्टरचालकाचे सुमारे ४ लाख रुपये किमतीचे तर सहभागी  ट्रॅक्टरमालक सुरेंद्र सिंह याची १० लाख आणि ४ लाख रुपये किमतीची दोन घरेही जमीनदोस्त करण्यात आली, असे जिल्हाधिकारी तरुण भटनागर यांनी सांगितले.