प्रतिकात्मक छायाचित्र
🔺रेल्वे सुविधा /पर्यटन/ प्रवाशांची मागणी / मुंबई- आदिलाबाद मुंबई गाडीचा बल्लारशाह पर्यंत विस्तार 🔶 अखेर विस्ताराला मिळाला मुहूर्त; बल्लारशापर्यंत धावली नंदिग्राम एक्सप्रेस
मुंबई -नांदेड : वृत्तसंस्था- अखेर मुंबई गाडी बल्लारशा पर्यंत धावली, विस्ताराचा मुहूर्त मिळाला. मुंबई-आदिलाबाद- मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वेचा अखेर बल्लारशापर्यंत विस्तार झाला आहे. ५ मे रोजी ही रेल्वे बल्लारशापर्यंत धावली.मोठ्या प्रतीक्षेनंतर नंदिग्राम एक्स्प्रेसचा बल्लारशापर्यंत विस्तार झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
या मार्गावरील आणि भागातील प्रवासी नागरिकांची मुंबई-आदिलाबाद या नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वेचा विस्तार करावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती, मार्च महिन्यात नंदिग्राम एक्स्प्रेस या रेल्वेचा विस्तार बल्लारशापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने कळविल्यानुसार, नंदिग्राम एक्स्प्रेस गाडी क्रमांक (११४०१) बल्लारशापर्यंत विस्तारित केल्याचे मध्य रेल्वेने कळविले. त्यानंतर २ मे रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने या रेल्वेगाडीचा विस्तार झाल्याचे जाहीर केले होते.
मुंबईहून निघालेली नंदिग्राम एक्स्प्रेस बल्लारशा येथे ५ मे रोजी १.४५ वाजताच्या सुमारास पोहोचली. आता हीच रेल्वे ७ मे रोजी सकाळी ८.३० वाजता बल्लारशा येथून मुंबईकडे सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
🔺या रेल्वेगाडीला पिंपळकुटी, वनी, भांडक आणि चंद्रपूर या रेल्वेस्थानकांवर थांबा राहणार आहे.

