
धार्मिक सोहळा /मूर्ती प्राण प्रतिष्ठापना
सोलापूर – श्री शुध्द (सुख) व स्वकुळ साळी समाजसेवा संस्था आयोजित करलीनगर येथे बुधवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता भगवान जिव्हेश्वर व माता अंकीनी- दशांकीनी मुर्तीसह कलशाचे वाजत गाजत, जयघोषणाने सवाद्य मिरवणूक काढण्यात आले आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आले.
प्रथमतः या कार्यक्रमास सर्व मान्यवर उपस्थितांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. या मंदिराकरीता सभामंडप बांधून दिलेले सौ शांताबाई व निवृत्ती गायकवाड या दांपत्याचे शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, या कार्यक्रमास मुंबई मंत्रालयातील वन व महसूल कक्ष अधिकारी, जागतिक साळी फौंडेशनचे संस्थापक मा. विजय वक्ते साहेब, धाराशिव येथील उद्योजक संजय गणेश, स्वकुळसाळी समाज विठ्ठल मंदिरचे सचिव जयहरी साखरे, विश्वस्त तथा उद्योजक महादेव सरवदे, ठाणे येथील समाजाचे अध्यक्ष डाॅ. सौ. संध्या वैद्य, मा. नगरसेविका सौ. जयश्री सपार, श्री जिव्हेश्वर विद्यार्थी मंचचे सचिव ज्ञानेश्वर सपकाळ आदी प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थित मान्यवरांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय राजकडे, सचिव नंदू सपार, उपाध्यक्ष शरदचंद्र पवार, सहसचिव हिरालाल पिसे, खजिनदार तुकाराम राजकडे, प्रकाश साखरे, विजय भैसे, विष्णू भुरे, अमोल भुरे, श्रीनिवास वांझरे, दत्तात्रय भुरे आदींच्या हस्ते शाल, गुच्छ देऊन करण्यात आले, या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास चन्नपा राजकडे, रामकृष्ण पवार, अंबादास याळगे, विठ्ठल कांबळे, किरण भैसे, गोविंद भैसे, गंगाधर याळगे, मनोहर भुरे श्रीनिवास याळगे, विलास पवार, अर्जुन भैसे, मनोहर कांबळे रमेश विन्नू आदीनी खुप परिश्रम घेतले.नंतर महाप्रसादाचा उपस्थितानी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी टोणपे यांनी केले व आभार प्रदर्शन कु. वंदना ढगे यांनी मानले.

