गुरु महात्म्य पुरस्कार अशोक सराफ, डॉ. काटकर,प्रल्हाद पै यांना  जाहीर

Pc -x

🔺समाजप्रबोधन🔺अध्यात्मिक🔺चित्रपट, 🔺नाट्यकला, 🔺अभिनय-मनोरंजन.

🔶 अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यात १० मे रोजी होणार वितरण

पुणे- अत्यंत मानाचा  कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे गुरुमाहात्म्य पुरस्कार अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. कैलास काटकर यांना जाहीर झाला. १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी दिली.

श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला असून नाट्य, सिनेमा, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात येणार आहे. प्रल्हाद वामनराव पै हे जीवन विद्या मिशनद्वारे मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करीत आहेत.