तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायं. ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

🔹 लोकसभा २०२४ निवडणूक / ३ रा टप्पा 

🔹मतदानाचा टक्का घसरला 

मुंबई, दि.७  : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
🔺 लातूर – ५५.३८ टक्के
🔺 सांगली – ५२.५६ टक्के
🔺 बारामती – ४५.६८ टक्के
🔺 हातकणंगले – ६२.१८ टक्के
🔺 कोल्हापूर – ६३.७१ टक्के
🔺 माढा – ५०.०० टक्के
🔺 उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
🔺 रायगड – ५०.३१ टक्के
🔺 रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
🔺 सातारा – ५४.११ टक्के
🔺 सोलापूर – ४९.१७ टक्के

एकूणच मतदानाच्या टक्केवारीत मोठी कमी झाली असून राज्यातील प्रचंड उष्णतेची लाट , राजकीय स्थित्यंतरे , लोकांचा मतदान प्रतिचा कमी  प्रतिसाद अशा अनेक कारणाची चर्चा होत आहे.