महाराष्ट्रासह सहा राज्यांत भीषण पाणीटंचाई

🔶 महाराष्ट्रात नेते निवडणूकित दंग.. प्रचारात पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाहीच .. अनेक मोठ्या प्रकल्पात मृतसाठा शिल्लक, मेमध्ये दाहकता अधिकच वाढणार. 

बीड /एम एन सी न्यूज नेटवर्क -मराठवाड्यात गेला पावसाळ्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. तो ही कुठे अधिक तर कुठे कमी पाऊस झाला.चालू मे महिना जुनचे म्हणजेच उन्हाळ्याचे जून १५ तारखे पर्यन्त ४५ दिवस अतिशय कठीण  आहेत. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात भीषण पाणी परिस्थिति आहे. एकूणच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाणी  टंचाई  गंभीर आहे. मागील दहा वर्षांच्या सरासरी पाणीसाठ्याचा विचार करता राज्यात ११ टक्के कमी पाणीसाठा आहे.  यामुळे या विभागाच्या आठही जिल्ह्यां पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मराठवाड्याचा मुख्य असा जलसोत्र जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.🔶

मात्र सध्य स्थितीत महाराष्ट्रासह शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बिहार, नागालँड या राज्यांवर भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. मे महिन्यात सुरवातीच्या या आठ दिवसात मध्येच  टंचाईची दाहकता वाढणार असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय जल आयोगाने देशातील प्रमुख १५० जलसाठ्यांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला. यातील माहितीनुसार दक्षिण भारतातील केरळ वगळता सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. तेलंगणातील प्रमुख सात धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. या राज्यांतील धरणांत जेमतेम ३५ टक्के पाणी आहे. आंध्र प्रदेशातील चार धरणांत अवघा १३ टक्के पाणीसाठा आहे. कर्नाटकातील १६ धरणांत २६ टक्के पाणीसाठा आहे. तामिळनाडूतील सात धरणांत ३० टक्के पाणीसाठा आहे.

मागील दहा वर्षांच्या सरासरी जलसाठ्याचा विचार करता, आंध्र प्रदेशात ६८ टक्के, तेलंगणात १० टक्के, कर्नाटकात २६ आणि तमिळनाडूत २७ टक्के कमी पाणीसाठा आहे. मध्य-पूर्व भारतात देखील पाणी टंचाईच्या झळा दाहक होत आहेत. बिहारमध्ये पाणीटंचाई भीषण असून या राज्यातील धरणांमध्ये जेमतेम दहा टक्के पाणीसाठा आहे. या राज्यात टंचाईची स्थिती गंभीर ठरत आहे. साधारणपणे दहा वर्षांच्या तुलनेत बिहारमध्ये ५९ टक्के कमी पाणीसाठा आहे. पूर्वेकडील नागालँडमध्ये १४ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १९ टक्के कमी पाणीसाठा आहे.

अहवालातील माहिती नुसार विविध राज्यांतील पाणीसाठा
🔺 महाराष्ट्र : ११ टक्के 🔺कर्नाटक : २६ टक्के 🔺 तेलंगणा : १० टक्के 🔺 आंध्र प्रदेश : ६८ टक्के 🔺उत्तर प्रदेश २५ टक्के 🔺 छत्तीसगड : २२ टक्के 🔺नागालँड : १४ टक्के 🔺 बिहार : ५९ टक्के 🔺 तमिळनाडू : २७ टक्के असा आहे त्यामुळे पाणी जपुन वापरणे गरजेचे आहे.