एसटी बँकेवरील सदावर्ते पती-पत्नीचे संचालक पद रद्द

🔶 एसटी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर

मुंबई: वृत्तसंस्था सहकार खात्याने अॅड, गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांचे एसटी बँकेवरील संचालकपद रद्द केले आहे. शिवाय बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे. एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी याप्रकरणी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी सहकार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को- ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत, अशा प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररीत्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे.