वाढत्या तापमानामुळे कार्यकर्त्यांवर मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे कठीण आव्हान

🔶 लोकसभा निवडणूक २०२४, प्रचार 🔶 तापमान वाढ 🔷 मतदानाचा टक्का

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – तालुक्यात सध्या तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या टप्पा पर करतो आहे प्रचंडउष्मा लाही लाही करणार उन्ह असह्य होत असून वाढत्या तापमानामुळे दैननंदिन जीवनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र सध्या परळी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.मे महिन्यातील अति उष्ण उन्ह अंगाची लाहीलाही करत असून तीव्र उष्णतेमुळे दुपारी रस्ते संचारबंदीअसल्यासारखे निर्मनुष्य होत आहेत. त्यामुळे दुपारी बाजारपेठा ओस दिसत आहेत. वाढत्यातापमानामुळे पशु, पक्षी, प्राणी या सर्वावर विपरीत परिणाम झाला आहे. शेतमजुरांनादिवसभर उन्हात काम करणे त्रासदायक ठरत आहे. तर जनावरे ,शेळ्या-मेंढ्या दुपारी चरणे बंद करून झाडाखाली विश्रांती घेताना दिसत आहे.

वाढलेल्यातापमानामुळे जनावरांच्या दूध देण्यात काही प्रमाणात घटझाल्याची माहिती दूधगंगादूध विक्रेत्याकडून मिळते आहे. मोकळ्या मैदानात, रांमळावर वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे पक्ष्यांचा मानवी वस्तीमध्येचिवचिवाट वाढला आहे. अति उष्ण तापमानामुळेउष्माघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळेनागरिकांनी सतत पाणी प्यावे, शक्यतो दुपारी १ ते ४ वाजे पर्यंत घराबाहेर पडणे टाळावे, जर बाहेर जाणे गरजेचेच असेल तर शक्यतो सुती कपडे, वापरावेत वडोक्यावर गमजा, मोठा रुमाल घेऊन जा अशी घरातील वडीलधारी मंडळी  तरुणाना संगत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्याचे नेत्यांचे आदेश निवडणूक अन अतिउष्ण उन्ह या मुळे कार्यकरत्यांच्या अडचणीतमोठी वाढ झाली आहे. कार्यकर्त्यांचासकाळ-संध्याकाळ मतदार भेटीवर भर असून दुपारी भेटण्यास कोणीनागरिक उस्तूंक नाही.

लोकसभानिवडणुकीचा प्रचार सध्याच्या वाढलेल्या तापमानाच्या दुपारी काहीसा थंडावल्याचेचित्र दिसून येत आहे. सकाळ व सायंकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देतआहेत. तसेच तीव्र तापमानामुळे मतदारांना घराबाहेर काढून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचेआव्हान सर्वपक्षीय कार्यकर्त्यांपुढे सध्या आहे.