बलात्काराची खोटी तक्रार; न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा,

🔶 खोटी साक्ष/ न्यायालये/ न्यायालयाची निरक्षणे/न्याय निवडा

उत्तरप्रदेश /लखनौ – वृत्तसंस्था: अनेक ठिकाणी एम केन कारणाने बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो, त्यासाठी काही वेळेस राजकीय बळाचाही वापर केला जातो . अनेक प्रकरणात अश्या प्रकारे तक्रारी दाखल केल्या जातात .नुकताच बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या बरेलीच्या २१ वर्षीय महिलेला १६५३ दिवसांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्यात आला.

या संदर्भात अधिक  माहिती नुसार सुमारे सहा वर्षा पूर्वी माहे सप्टेंबर २०१८ मध्ये १५ वर्षांच्या मुलीच्या आईने सांगितले की, अजय कुमारने तिच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला. खटल्याच्या सुनावणीत पीडित मुलीची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. मात्र, उलट तपासणीत दरम्यान अजयने बलात्कार केला नसल्याचे सांगितले.

न्यायालयाने खोटी साक्ष दिल्याबद्दल तिच्याविरुद्ध १९५ अन्वये खटला चालवून तिला दोषी ठरविले. अजय ४ वर्षे ६ महिने आणि ८ दिवस (१६५३ दिवस) तुरुंगात राहिला, तितकीच शिक्षा कोर्टाने तिला दिली. शिवाय रुपये ५ लाख८८ हजार ८२२ रुपयांचा दंडही ठोठावला.

……………………………………………………………………..

सरकार, प्रशासन आणि न्यायालयांनी महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की, स्त्रियांना गैरफायदा घेत पुरुषांच्या हितावर आक्रमण करण्याचे स्वातंत्र्य आहे. 

ज्ञानेंद्र त्रिपाठी, (अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश)