कु.महिका गुरूप्रसाद देशपांडे चे सीबीएसई दहावी परीक्षेत घवघवीत यश

सीबीएसईच्या दहावी परीक्षेत राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश ; 100 टक्के निकालाची परंपरा कायम

बीड /परळीवैजनाथ / प्रतिनिधी-परळी येथील राजस्थानीज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या 2023-2024 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. कौतुकास्पद, मराठी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन निकालाची परंपरा कायम राखली आहे.

नुकत्याच मार्च- एप्रिल 2023-2024 दरम्यान सीबीएसई कडून दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

यापैकी कु. महिका डॉ. गुरुप्रसाद देशपांडे या विद्यार्थीनींनी 97.6 टक्के गुण घेऊन परळीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. शर्वरी शिवाजी पवार हिने 94.8 टक्के, चि.ओम अनिल घुगे यांने 94.8 टक्के, गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. खुशी संतोष नावंदर हिने 94.6 टक्के, कु. रिधिमा राहुल पाठक हिने 94.6 टक्के गुण घेऊन या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला आहे.या निकालाचे विशेष बाब म्हणजे 21 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.

दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत पोदार लर्न स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये मानसी तिवारी, नवनाथ गव्हाणे, रचना खंदारे, सपना लाहोरकर, श्रावणी अय्या, स्नेहल कदम ,शर्वरी पवार आणि तन्मय अहिरे यांचा समावेश आहे.तसेच 90 ते 100 या दरम्यान मराठी विषयात 54 विद्यार्थ्यांनी गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळविले. या विशेष कामगिरीबद्दल मराठी विभाग प्रमुख दिनेश जयतपाळ यांचा शाळेच्या वतीने अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे.

शाळेचे अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, प्राचार्य मंगेश काशीद , उपप्राचार्य लक्ष्मण पाटील, परीक्षा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुठ्ठे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.