परळी शहरा नजीकचा चांदापुर तलाव कोरडा ,त्या खाली येणाऱ्या जुन्या गावभागात भिषण पाणी टंचाई

🔶 दाहक उन्हाळा, तालुक्यातील अनेक तलाव कोरडे, भीषण पाणी टंचाई, ,नेते व्यस्त निवडणुकीत.
🔷 तलाव कोरडा गाळ उपसा सुरू ,🔺 पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर

बीड/परळी वैजनर्भ /एम एन सी न्यूज नेटवर्क – शहरा  नजीकचा चांदापुर तलाव कोरडा पडल्याने त्या खाली येणार शहरातील जुना गाव भाग प्रभावित झाला असून जुन्या गावातील अनेक आड ,विहिरी, बोर कोरडे पडले आहेत. पाणी टंचाई मुळे  नागरिक हवालदिल झाले आहेत.दरम्यान  चांदापुर तलाव कोरडा पडल्याने यातील गाळ उपसा केला जात आहे.

चांदापुर तलावाच्या खाली परळी शहरातील  जूना  गावभाग,जलालपुर, वंडर कॉलणी पावरलूम ,शिवाजीनगर हा भाग येतो. मात्र दोन महिन्या पूर्वीच तलाव कोरडा पडल्याने या भागात पाणी प्रश्न भेडसावत आहे .
परळी तालुक्यात भीषण पाणी टंचाईल सुरवात झाली असून वाण प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणी साठा सुमारें ५०  % आहे. तालुक्यातील ईतर लघु आणि मध्यम साठवण तलाव मार्च  अखेरीस कोरडे पडले आहेत . त्यामुळे परळी शहरासह एकूणच तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. परळी तालुक्यातील मध्यम व लघु मध्यम प्रकल्प  कोरडे  पडत आहेत. अनेक मध्यम व लघु मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा शून्यावर येऊन ठेपला आहे.येणाऱ्या काळात पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावण्याची शक्यता आहे.