मतदानाच्या दुसर्‍याच दिवसापासून पंकजाताई मुंडे लागल्या कामाला ; पदाधिकारी,कार्यकर्त्यांची घेतली भेट

🔶थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन परिवाराचे केले सांत्वन

बीड-परळी वैजनाथ– लोकसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया काल पार पडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे आज सकाळपासून लगेचच कामाला लागल्या. आज दिवसभर त्यांनी परळीतील ‘यशश्री’ निवासस्थानीं त्यांना भेटण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीसाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपला विजय निश्चित आहे. मतदार विकासाच्या बाजूने असून तुमच्या आशिर्वादानेच विकासासाठी काम करत राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दुपारी त्यांनी मतदानाच्या दिवशी अपघातात जीव गमावलेल्या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

जिल्ह्यात सर्वत्र सोमवारी मतदानाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे पार पडल्यानंतर पंकजाताई मुंडे आज लगेचच पुन्हा कार्यकर्त्यांत मिसळल्या. सकाळपासून जिल्हाभरातून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परळी निवासस्थानी पंकजाताईंना भेटण्यासाठी आले होते. यावेळी पंकजाताईंनी प्रत्येकाकडून मतदारसंघनिहाय आढावा घेत पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. जनतेचा आशीर्वाद मला निश्चित मिळेल अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.

🔺🔶 थेरला येथील युवकाच्या निधनाबद्दल पंकजाताई व्यथित ; घरी जाऊन केले परिवाराचे केले सांत्वन
——
मतदानासाठी येत असताना थेरला येथील युवक अंगद रामहरी नागरे याचे शिरूर घोडनदी जवळ रस्ता अपघातात दुःखद निधन झाले. ही बातमी समजल्यावर त्या व्यथित झाल्या. काल सर्वत्र मतदान सुरू असल्याने त्या जाऊ शकल्या नव्हत्या पण आज दुपारी त्यांनी थेरला येथे जाऊन नागरे परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. मतदानाच्या दिवशीच आणखी एक घटनेत येवलवाडी येथील सुनिता नागरगोजे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला, त्यांच्याही घरी जाऊन पंकजाताईंनी परिवाराची भेट घेतली धीर दिला.