संस्कार शिबिर / व्यायाम /तंदुरुस्त शरीर
🔶 हनुमान व्यायाम शाळेचे उन्हाळी शिबिर, सुमारे ३५० मूला-मुलींचा सहभाग 🔶 स्व-संरक्षण आणि मैदानी खेळांत प्राविण्य
🔶 वैद्यनाथ बँकेचे विशेष साह्य.
बीड /परळी वैजनाथ – धनंजय आरबुने- सध्य स्थितीत मुला मुलींच्या निकोप शारीरक आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे हे पालकवर्गाला हनुमान व्यायाम शाळेच्या वार्षिक उन्हाळी वर्गामुळे पटले आहे. आपल्या मुला -मुलीस दैनदीन जीवनात आनंदी आणि सस्मित चेहऱ्याने आलेल्या अडचणी आणि बिकट प्रसंगाला तोंड देण्याचे कौशल्य या शिबिरामुळे प्राप्त होत असल्याचे अनेक पालकांन सोबत केलेल्या चर्चेतून दिसून.
परळी शहरातील सर्वात जुन्या असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या वतिने मागील ३४ वर्षांपासून व्यायाम शिबीर व संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. यावर्षी व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईटके, उपाध्यक्ष नारायणदेव गोपनपाळे, चंद्रकांत समशेट्टे, सचिव देवीदास कावरे, अनंत भातांगळे, वैद्यनाथ बँकेचे विनोद खर्चे, हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी शिबिरात व्यायामाचे धडे घेताना विद्यार्थी त्र्यंबक काटकर, सुरेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर प्रमुख सुभाष नानेकर यांच्या उपस्थितीत १८ एप्रिल ते १९ मे या कालावधीत हे शिबीर वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेकडील शिवालय भवन मैदानावर होत आहे. या शिबीरात योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा, श्लोक पाठांतर, विविध गिते, बोधपर कथा, सुविचार, बौध्दिक खेळ, स्वयंप्रेरणेचे धडे, समयसुचकता, सूर्यनमस्कार, दंड बैठका, मल्लखांब, रोप मल्लखांब, कुस्ती, लाठी-काठी, कराटे, तलवारबाजी, दांडपट्टा, बॉक्सिंग, लेझीम, मानवी मनोरे, मार्चपास आदी गोष्टी शहरातील विविध क्रिडा शिक्षक या मध्ये विलास आरगडेसर, महात्मा हत्तेसर, अतुल दुबे सर, बालासाहेब हंगरगे, अतुल नरवाडकरसर, विजय मुंडेसर, एड. सायस मुंडे, बापू कावरे सर, यशवंत कांबळे सर, विक्रम स्वामी,चंद्रकांत चाटे, बालासाहेब कराड सर, दत्ता नागापुरे,महादेव फड, माऊली मुंडे,अमित कचरे,राजेश गडदे,संजय रनखांबे,उमाकांत कुरे,दिगंबर नागराळे, वैजनाथ आचार्य, सीताराम कराड,वैजनाथ ईटके आदी तज्ज्ञ शिबीरार्थी मुला-मुलींना प्रशिक्षण देत आहेत.
या शिबीरात ३५० मुला- मुलींचा सहभाग लक्षणीय असून हनुमान व्यायाम शाळेच्या या शिबिरात सहभागी झालेल्या ३५० विद्यार्थ्यांपैकी १६० मुलींनी सहभाग नोंदवला आहे. वैद्यनाथ मंदिरासमोरील मैदानावर लाठी, काठी, कराटे, तलवारबाजी, श्लोक पाठांतराचे धडे घेत आहेत. या शिबिरात यंदा परळी शहरासह विविध भागातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मुलींचा सहभाग असलेले हे शिबिर परळीच्या भावी पिढीला सक्षम करणारे ठरत आहे. या शिबीरासाठी आता हनुमान व्यायाम शाळा स्वतःची जागा घेण्याचे प्रयत्न करत असून हे शिबीर निवासी करण्याचा विचार हनुमान व्यायाम शाळेचें संचालक मंडळ करत असल्याचे हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष दत्ताप्पा ईंटके यांनी महाराष्ट्र न्यूज कनेक्ट प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सह प्रशिक्षक तर मुलींच्या साह्यासाठी सहयाक मुली उस्फूर्तपणे मदत करत आहेत.
🔺महादेव काळे🔺 भरत गिराम 🔺अजय राऊत🔺 शिवं गर्जे 🔺सागर पुजारी🔺सुदर्शन लिखे 🔺पवन साळुंखे 🔺श्रेयस फुलारी🔺 नितीन कुलकर्णी🔺 दयासागर पुजारी🔺 देविदास दीक्षित🔺अनिल भंदे🔺 नंदकिशोर पुजारी🔺आदित्य नागराळे🔺 शिवशंकर कराड
तर मुलींमध्ये 🔺पायल पवार🔺 स्वाती वाघमारे🔺 अस्मिता कावरे🔺 श्रावणी साबणे🔺 प्रणिता चाटे🔺 संस्कृति संघई
🔶 शारीरिक तंदुरुस्ती आणि खंबीर मनोबल असण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारे योगासन, प्राणायाम, काठी लाठी, कराटे, तलवारबाजी, पोहणे, श्लोक पाठांतर, ध्यान धारणा, लेझीम, कुस्ती, मार्चपास, मानवी मनोरे आदींचे प्रशिक्षण परळीतील सुमारे ३५० विद्यार्थी व विद्यार्थीनी घेत आहेत.