आयकर विभागाच्या धाडीत नांदेडच्या भंडारी कुटुंबीयांकडे १७० कोटीं सापडले

नांदेड :व्रतसंस्था- आयकर विभागाच्या ८० अधिकाऱ्यांची सलग तीन दिवस कारवाई आयकर विभागाने शुक्रवारी पहाटे नांदेडमध्ये एकाचवेळी सात ठिकाणी फायनान्स कंपनी चालविणाऱ्या भंडारी कुटुंबियांवर छापेमारी केली. जवळपास ७२ तास चाललेल्या या कारवाईत तब्बल १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यामध्ये १४ कोटी रोख आणि ८ कोटींच्या १२ किलो दागिन्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतची आयकर विभागाची ही सर्वात मोठी या धाडीत १४ कोटी रोख आणि ८ कोटी किमतीचे १२ किलो दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली. कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे नांदेडातील फायनान्स कंपनी आणि बड्या उद्योगपतींचे मात्र धाबे दणाणले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. त्यात नाशिकसह नांदेड, नागपूर आयकर विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. नांदेडातील भंडारी कुटुंबियांचीही फायनान्स कंपनी आहे. त्यांचा मराठवाड्यात जमिनी खरेदी-विक्रीचाही मोठा व्यवसाय आहे. त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या फायनान्स कंपनीत आठ नातलगांचा समावेश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार केले असून आयकर चुकविल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चार वाजताच आयकर विभागाच्या ८० अधिकाऱ्यांचे पथक नांदेडात धडकले होते. शिवाजीनगर भागातील अली भाई टॉवर येथे असलेल्या फायनान्स कंपनीच्या मुख्य ऑफिससह शहरात भंडारी कुटुंबियांच्या मालकीच्या इतर सहा ठिकाणी एकाचवेळी धाडी मारण्यात आल्या.

दोन दिवसांच्या झाडाझडतीत दागिन्या सह सोन्याची ५० बिस्किटे

दागिन्यात सोन्याची ५० हून अधिक बिस्किटे होती. तसेच हिरे व इतर मौल्यवान दागिने आहेत. भंडारी यांच्या वेगवेगळ्या आस्थापनांमधून कागदपत्रे, सीडी, हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात व्यवहाराची कागदपत्रे लागली होती. त्यानंतर भंडारी यांच्या बंधूंच्या घरी रोकड मोजण्यासाठी १४ तास लागले गादीच्या खोळात पाचशेच्या नोटांची बंडले आढळून आली. ही रक्कम मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. सर्व रोकड १४ कोटी रुपये निघाली. त्याचबरोबर ८ किलो सोनेही आढळून आले.