राज्यातील धरनात अत्यल्प पाणी साठा,मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना

संग्रहित छायाचित्र

🔹मराठवाड्यात अनेक भागात भीषण पाणीटंचाई,

मुंबई – : नैऋत्य मान्सून केरळात ३१ मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनबाबत शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी असली तरी राज्यातील धरणसाठ्यात मोठी घट दिसत आहे. संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त १० टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे.

मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजघडीला फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पात १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या ११ प्रकल्पापैकी ३ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

तब्बल १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा -उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या. तब्बल १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. हिंगोली जिल्हा वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक संख्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात ५६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहेत. परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे पाच टँकरने पाणी पुरवठा सुरूआहे. पाण्याचे टँकर भरण्यासाठी व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या
विभागातील २ हजार ८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०४, जालना ४१३, परभणी ३८, हिंगोली ४९, बीड ३२२, नांदेड ५७, लातूर २७२ तर धाराशिव जिल्ह्यात ६२८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले.

हिंगोलीतील येलदरी धरणात २९ टक्के पाणीसाठा आहे, सिद्धेश्वर धरणातील जलसाठ्याने तळ गाठला आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा आणि निळवंडेतही कमी पाणीसाठा शिल्लक आहे. ज्यात भंडारदऱ्यात १५ टक्के, मुळा धरणात १०.५ टक्के लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात ८ टक्क्यांहून अधिक जलसाठा नाहीय. जायकवाडीचा पाणीसाठी ६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे. माजलगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठी आहे,