बारामती नंतर शिरूर (कारेगावं)  ईव्हीएम सुरक्षा सीसीटीव्ही डिस्प्ले २४ तास बंद

सुरक्षा इव्हिएम ची

मतदारात मात्र संभ्रम आणि शंकेस जागा 

पुणे : वृत्तसंस्था : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदार संघासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम ठेवलेल्या कारेगाव गोदामातील सीसीटीव्ही डिस्प्ले बंद असल्याची घटना घडली आहे.

मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या कारेगाव गोदामातही सीसीटीव्ही डिस्प्ले २४ तासापेक्षा अधीक काळबंद असल्याची घटना उघडकीस आली.हा प्रकार वरिष्ठअधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने डिस्प्ले सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र, उमेदवार आणि उमेदवारांचे  निवडणूक प्रतिनिधींना पुसटशी कल्पनाही नव्हती. एकीकडे बारामतीतील उमेदवारांची आणि त्यांच्या प्रतिनिधींची  तत्परता, तर दुसरीकडे शिरूरमधील उमेदवारांच्या अनास्थेची चर्चा सुरू आहे. मात्र, गोदामातील सीसीटीव्ही सुरूच होते. केवळ सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होता असि माहिती मिळते आहे. मतदारात मात्र संभ्रम आणि शंका निर्माण झाली आहे.