पर्यटन /भ्रमंती सहल यात्रा
कोकण रेल्वे /कोकणात सुटी साठी जानारांना सुविधा
नाशिक /नाशिक रोड उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची सेवा १५ जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 07309/07310 वास्को दा गामा- मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक) गाडीच्या सेवेचा विस्तार होणार आहे.
07309 वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. (साप्ताहिक) विशेष या गाडीची सेवा दिनांक 08/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 12/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी वास्को द गामा येथून दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को दा गामा (साप्ताहिक) विशेष या गाडीची सेवा दिनांक 11/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 15/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी मुझफ्फरपूर जंक्शन येथून दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं.. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.