मराठवाड्यात अवकाळी पाऊस २२ मे पर्यंत

🔺इस्रो वेधशाळेने उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या छायाचित्रां वरून  अभ्यास 🔷 अवकाळी पाऊस  मराठवाड्यातील अंदाज,

परभणी– मराठवाड्यात १८ ते २२ मे या काळात काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

अहमदाबाद येथील इस्रो वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, उपग्रहाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या छायाचित्रांमध्ये मराठवाड्यात बाष्पीभवनाचा वेग  वाढला असून त्यामुळे. येत पाच सहा  दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

१८ मे रोजी लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात, १९ मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची शक्यता आहे, १८ मेनंतर किमान तापमानातही वाढ होणार आहे. त्यामुळे रात्री अधिक उकाडा जाणवेल. १७ ते २२ मेदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल.