एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याची कोट्यवधींची माया

🔺 बीड जिल्ह्यात पोलिसांनी विश्वास गमावला, रक्षकच निघाले भक्षक

एक कोटी आठ लाख 76 हजार 528 रुपयांची रोकड,अनेक शहरात स्थावर मालमत्ता🔺 सहकारी फोजदार जाधवर ही मोठी मालमत्ता बाळगून

बीड – पतसंस्थेच्या आर्थिक तपासात मदत करण्यासाठी एका व्यवसायिकाला एक कोटी लाच मागून त्यातील काही रक्कम स्वीकारताना नुकतीच अटक करण्यात आली होती. एक कोटीची लाच मागणारा बीड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या चाणाक्यपुरी येथील घराची झाडाझडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मोठी रोख रक्कम सोने चांदीचे दागिने आढळून आले यामध्ये तब्बल एक कोटी आठ लाख 76 हजार 528 रुपयांची रोकड, सोन्याची बिस्किटे व दागिने असा 72 लाखांचा ऐवज, साडे पाच किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत 4 लाख 62 हजार आहे. याशिवाय बारामती व इंदापूर येथे फ्लॅट, बारामती व परळी येथे प्लॉट व इंदापूर येथे व्यापारी गाळा व इतर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.

सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुण ताब्यात घेण्यात आला आहे . दरम्यान घर झडती पथकामध्ये— पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे , पोलीस निरीक्षक युनुस शेख , अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी , हनुमंत गोरे , अमोल खरसाडे, गणेश मेहेत्रे , संतोष राठोड , सुदर्शन निकाळजे आदी असून याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात लाच गुन्हा याचा गुन्हा आहे. मुख्य आरोपी हरिभाऊ नारायण खाडे हा पसार असल्याने व त्यांचे चाणक्य पुरी बीड येथील किरायाचे राहते घर कुलुप बंद असल्याने 15 मे रोजी सिल बंद करुन पहारेकरी नेमण्यात आले होते.

16 मे रोजी विशेष न्यायालय बीड यांचेकडुन सि.आर. पी. सी. कलम 100 नुसार सर्च वॅारंट प्राप्त करुन पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांचे शहरातील चाणक्य पुरी येथील राहाते घराची पंचा समक्ष घर झडती घेतली असता वरील प्रमाणे मुददेमाल मिळुन आला. दरम्यान बुधवारी खाडे याच्या सांगण्यावरून पाच लाच घेताना पकडलेला कुशल जैन याला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान खाडे च्या एक कोटी प्रकरणाचा तपास इतर यंत्रणाकडे देण्याची मागणी केली जात आहे.