मुळं मूळ नष्ट करतात तेव्हा’…. 🌿

🔷 निसर्ग सौंदर्य 🔷 पुरातन वास्तू वैभव-भ्रमंती, पर्यटन स्थळे

नमिता प्रशांत- अमरावती – दगड आणि झाड… निसर्गाचेच अंग, अगदी हाडामासांसारखेच… म्हणजे एकरूप होणारच. एकमेकांना बिलगणारच… त्यातल्यात्यात त्यांच्या मिलनाची वेळ दृष्टीआड गेली, की त्यांना विलग करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. कुणीही वेगळं करू शकत नाही. और ये प्यारभी इतना कातिल हैं यारों… की अगदी मृदू स्वभावाचं झाड आपल्या मुळ्यांनी कधी हळूहळू कणखर अशा दगडाला पिळा देऊन देऊन, खिळखिळं करून, त्याची माती करून कधी त्याला नेस्तनाबूत करून टाकतं…भल्याभल्यांना कळतंही नाही.
आम्ही किल्ला फिरत असतांना, एक वनाधिकारी सर म्हणालेत, की झाडांच्या मुळानी इतिहास गडप केलाय..त्यावर मी म्हंटले, की धरून ठेवलाय…आम्ही दोघेही क्षणभर एकमेकांकडे बघितलं आणि हसलो… ते म्हणाले, प्रश्नच आहे… मोठ्ठा पेच आहे..!
(आपल्यालाच राखता आलं नाहीये… आपलंच दुर्लक्ष झालंय 😞 )
खरं म्हणजे, कितीही भक्कम बांधकाम असो, झाडांच्या मुळा हळूहळू ते खिळखिळं करून टाकण्याची ताकद ठेवतात. पण किल्ला फिरतांना बऱ्याच ठिकाणी जाणवलं, की ह्या मुळंनी चक्क इतिहास धरून ठेवलाय…

नाहीतर एवढंही शिल्लक नसतं. कोसळणाऱ्या भिंती मुळामध्ये मजबूत धरून ठेवल्या आहेत.
वनविभाग आणि पुरातत्वविभाग यांचं कधीही जमणं शक्य नाहीये. एकाला झाड वाचवायचं असतं तर एकाला दगड…आणि हया दोन्ही मंडळींना काळ आणि निसर्ग यांच्यासमोर नतमस्तक व्हावेच लागते. बरेचदा पर्यायच उरत नाहीत आणि वेळ तर नेहमीच यांच्या हातातून निघून गेलेली असते..😅
असो, एकदा वेळ निघून गेली की पर्यायही उरत नाहीत हेच खरे…आपण मात्र या अगतिकतेलाही “अद्भुत निसर्गसौंदर्य” म्हणून वानवत राहतो…तुमचं काय म्हणणं आहे यावर???
– नमिताप्रशांत 🌿