बारावी बोर्डाचा निकाल २१ मे रोजी

🔺३,३२० केंद्र,🔺 १५ लाख १३ हजार ९०९ परीक्षार्थी

संभाजीनगर-नुकताच राज्यातील सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाचे वेध लागले आहे. नऊ विभागीय मंडळांचे २०२१ निकाल तयार झाल्याने राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार असून २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचा अंदाज आहे.

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान घेण्यात आली. राज्यात यंदा ३,३२० केंद्रांवर १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कोरोना काळापासून शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडेले होते. त्यामुळे पेपर तपासणीला विलंब होवून निकाल लांबत होता. त्यामुळे बोर्डाकडून या वेळी लवकर पेपर तपासणीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी राज्य मंडळातर्फे तिसऱ्या आठवड्यात बारावीचा तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, ९ विभागांच्या निकालाचे काम पूर्ण झाल्याने सोमवारी राज्य मंडळ पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर करू शकतो. त्यानुसार मंगळवारी (दि.२१ मे) बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी शक्यता आहे.