पाचव्या टप्पा 13 मतदारसंघात सायं. 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

लोकसभा २०२४ निवडणूक / पाचवा टप्पा /मुंबई विभाग

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.

मतदारांचा सहभाग वाढवा म्हणून प्रशासनाने मोठे प्रयत्न केले होते.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

🔺 भिवंडी- 48.89 टक्के
🔺 धुळे- 48.81 टक्के
🔺 दिंडोरी- 57.06 टक्के
🔺 कल्याण – 41.70 टक्के
🔺 मुंबई उत्तर – 46.91 टक्के
🔺 मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के
🔺 मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के
🔺 मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के
🔺 मुंबई दक्षिण – 44.22 टक्के
🔺 मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के
🔺 नाशिक – 51.16 टक्के
🔺 पालघर- 54.32 टक्के
🔺 ठाणे – 45.38 टक्के