परळी शहरातील उष्माघाताचा पहिला बळी गेला

अतिउष्ण तापमान /प्रचंड तापलेले सीमेंट रस्ते 

बीड/परळीवैजनाथ /एम एन सी न्यूज नेटवर्क- सोमवारच्या आठवडी  भाजी बाजारात आज असह्य उन्हाची तीव्रता  सहन न झाल्याने भाजीबाजारत उष्मा घातणे एक भाजी विक्रेत्याचा बळी गेला. मात्र हातावर पोट असणाऱ्या लोकांना उन्हात काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही. आठ दिवसात शहरातील आणि तालुक्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.  असह्य उन्हाची तीव्रता असून घराबाहेर  बाहेर पडणे अवघड झाले आहे . यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजीविक्रेत्यावर काळाने घाला घातला असुन उष्माघाताने त्यांचा बळी गेला आहे.

परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव संभाजी गुट्टे (वय 54) वर्ष असे मृत भाजी विक्रेत्याच नाव आहे. अल्पभूधारक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात हातावर भाजीपाला विकतात. आज सोमवार रोजी आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे भाजी विक्रीसाठी हे शेतकरी बसले होते. सकाळपासूनच उन्हाचा कडाका होता. परळीत दुपारच्यावेळी तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअस इतका वाढलेला होता. उन्हाची प्रचंड तीव्रता वाढलेली असल्याने भरदुपारी उष्माघाताचा जबर फटका या भाजीविक्रेत्याला बसला आणि भर बाजारातच उष्माघाताने भोवळ येऊन ते पडले. आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणले. मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.