🔷 मान्सून/केरळ राज्यात वेळेपूर्वीच मान्सून चा अंदाज
पुणे : वृत्तसंस्था- अनुकूल स्थितीमुळे मान्सून येत्या ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे वर्तविला आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य बंगालच्या
उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून एक दोन दिवसांत कमी दाबाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. या दोन्ही स्थिती मान्सून दाखल होण्यास अनुकूल आहेत. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळ राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल, असाही अंदाज वर्तविला आहे.