आज बारावी परिक्षेचा निकाल

🔶 निकालाची उत्सुकता

पुणे : राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल आज ‘जाहीर होणार आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काही संकेतस्थळावर तो ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकालाच्या तारखेच्या तारखेबाबत निश्चित अशी माहिती मिळत नव्हती. मात्र नुकतीच निकालाच्या बाबतीत राज्य शिक्षण मंडळाच्या सचिवांनी माहिती दिली आहे

फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या या. परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २१) दुपारी १:०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

निकाल पहाण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

🔺mahresult.nic.in

🔺http://hscresult.mkcl.org

🔺www.mahahsscboard.in

🔺https://results.digi- locker.gov.in