खाजगी ट्रॅव्हल आणि परिवहन मंडळाची बस यांचा भीषण अपघात

🔷 अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान अपघातात 🔺तीन जण गंभीर जखमी

वर्धा– सेलू- केळझर येथे ट्रॅव्हल्स बस आणि एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स बस आणि राज्य परिवहन बसचे मोठे नुकसान झाले आहे अपघातात 20 प्रवासी जखमी आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. केळझर येथील शहीद हरिभाऊ लाखे चौकात ही घटना घडली असून या  दरम्यान अपघातातील जखमींवर सेलू, सेवाग्राम येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहिती अपघाताचे नेमकं कारण समोर आलं नसून वाहन अनियंत्रित झाल्याने सदरील अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खाजगी ट्रॅव्हल बस ने एसटी बसला धडक दिली आहे. समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. यात दोन्ही वाहनांचे मोठें नुकसान झाले आहे.

दरम्यान खाजगी ट्रॅव्हल बस आणि राज्य परिवहन मंडळाची बस यातून प्रवास करणारे ट्रॅव्हल्समधील 16 तर बसमधील ४ जखमी झालें आहेत. यामध्ये तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींना सेलू, सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.