यश/ अभिनंदन
बीड/परळी वैजनाथ –डाॅ.झाकीर हुसैन शिक्षण संस्था संचलित डाॅ.झाकीर हुसैन विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेचा निकाल मंगळवार रोजी जाहीर झाला असून या निकालात परळी वैजनाथ येथील डाॅ.झाकीर हुसैन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन.
महाविद्यालयाचा निकाल हा 100% इतका लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.यामध्ये विद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान खान अबुबकर मोबीन व द्वितीय म्हणून शेख अर्शिया कौसर मुजाहेद व तसेच कला शाखेतून प्रथम येण्याचा मान शेख रिजवाना निसार यांनी तर बागवान शारमीन ईलीयास यांनी द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून 100% टक्के निकाल लागला आहे.
डाॅ.झाकीर हुसैन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हाजी वहाजोदीन मुल्ला साहेब व प्राचार्य पठाण मुनवरी बेगम हसन खान, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सिद्दिकी जरीना नाहीद व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिले.