🔶 प्रचंड उष्णता/सर्वाधीक उष्ण मे महिना.🔺भुसावळला सर्वोच्च ४७.१ तापमान
संभाजीनगर– राज्यात उष्णतेची लाट कायम असून गुरुवारी राज्यातील अर्ध्याहून अधिक जिह्यातील तापमान चाळिशीपार गेले होते. भुसावळला रेकॉर्ड ब्रेक सर्वोच्च ४७.१ तापमान नोंदवले गेले. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांतील पारा चाळीसपार होता. दरम्यान, येणार आठवडा उष्ण असण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे.
नाशिक- ४१.२,जळगांव- ४५.५, परभणी- ४१.१, जालना-४२.०, संभाजीनगर ४३.५, नंदुरबार ४५.२, बीड -४३.४,अकोला- ४५.५, अमरावती-४३.२, भंडारा- ४०.२, बुलडाणा-४२.०, गडचिरोली- ४२.६, गोंदिया- ४०.४, वाशिम-४२.०, वर्धा- ४३.२, चंद्रपूर – ४३.२, नागपूर- ४१.९, यवतमाळ-४३.५, मुंबई-३५.२, भुसावळ- ४७.१, धुळे- ४३.५, असे तापमान नोंदल्या गेले आहे.