🔷 राज्यात केवळ १३ हजार नोंदणीकृत एजंट🔷 बांधकाम व्यवसाय, रियल इस्टेट.
मुंबई-वृत्तसंस्था: राज्यातील रियल इस्टेट आणि त्या संदर्भातील अनेक व्यवसायातील संस्था आणि एजंट नी आपले कागदपत्र सादर न केल्यामुळे सुमारे 20000 पेक्षा अधिक एजंटचे परवाने निलंबित केले आहेत. बांधकाम क्षेत्रातील महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) राज्यातील २० हजार रियल इस्टेट एजंटांचे परवाने निलंबित केले आहे. यामुळे आता राज्यात केवळ १३ हजार नोंदणीकृत एजंट राहिले आहेत.
दरम्यान २० हजार एजंटांनी आपल्या परवाना प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केले नाही अथवा प्रमाणपत्र महारेराच्या संकेतस्थळावर अपलोड केलेले नाहीत. रियल इस्टेटमधील व्यवहारांसाठी सन २०१७ पासून महारेराने एजंटांची नोंदणी सुरु केली होती. त्यानंतर राज्यात एकूण ४७ हजार एजंटांनी नोंदणी केली होती. यापूर्वी १३,७८५ एजंटांनी नूतनीकरण न केल्यामुळे त्यांचे परवाने आधीच निलंबित केले आहेत.