वंजारी महासंघाच्या वतीने दुसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

🔶अहिल्यानगर येथे होणार दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन

🔶 स्वागताध्यक्षपदी आंतराराष्ट्रीय पुरस्कार विजेते कुस्तीपटू राजकुमार आघाव यांची निवड

अहिल्यानगर – :वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य अघाडी आयोजित वंजारी समाजाचे पाहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे डिसेंबर २०२२ मध्ये पार पडले होते. त्याच वेळी वंजारी समाजातील वैचारिक पोकळी भरून निघावी म्हणून द्विवार्षिक संमेलन अंखडीतपणे परंपरा म्हणून घेण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने २०२४ मध्ये संमेलन होण आवश्यक आहे. त्यामुळे अहिल्या नगर येथे सन २०२४ चे वंजारी समाजाचे दुसरे एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असून यजमान म्हणून संपुर्ण वंजारी समाज अहिल्या नगर जिल्हा आहे.

या संमेलनासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील हे असून अयोजक म्हणून अहिल्या नगर वंजारी महासंघ जिल्हा शाखा असल्याने जिल्हा अध्यक्ष मल्हारी खेडकर व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेणुकाताई वराडे (सानप) असतील त्यासोबतच लवकरच उर्वरित स्वागत अध्यक्ष समिती घोषित करण्यात येईल.  सोबतच अयोजन समिती सदस्य यांची देखील निवड करण्यात येईल. पाहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खानदेशरत्न साहित्य सम्राट प्रा वा ना आंधळे सर हे लवकरच आपला कार्यभार देऊन दुसरे संमेलनाध्यक्ष यांची निवड घोषित करतील. सन माहे डिसेंबर २०२२ मध्ये रावसाहेब थोरात सभागृह नशिक येथे वंजारी समाजाचे पाहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. हिच परंपरा अखंडीतपणे पुढे चालवली पाहिजे या अनुषंगाने विचार विनिमय करुन द्विवार्षिक संमेलन अंखडीतपणे घेण्याची परंपरा राखली जावी आणि प्रत्येक वेळी आयोजनाची संधी हि वेगवेगळ्या जिल्ह्याला असावी, सगळया जिल्ह्यांची संधी पुर्ण झाल्यावर पुन्हा मुळं त्या जिल्ह्याला संधी मिळेल अशा पद्धतीने आयोजन करण्यात येईल आणि याचा पुढील अंक म्हणून माहे सप्टेंबर ऑक्टोबर २०२४ मध्ये अहिल्या नगर या ठिकाणी संमेलन आयोजित करण्यात येईल.

त्या अनुषंगाने नुकतेच वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक विचारवंत आध्यत्मिक मार्गदर्शक गणेश खाडे यांनी अहिल्या नगर येथील महिला जिल्हाध्यक्षा रेणुकाताई वराडे सानप यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीस उपस्थित राहून संमेलना बाबत मार्गदर्शन केले. या वेळी अंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राजकुमार लक्ष्मण आघाव व अहिल्या नगरचे जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर सर त्या सोबतच अहिल्या नगर येथील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनाचे भव्य दिव्य अयोजन करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन समिती गठित करण्यात येईल आणि राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींना उपस्थित राहण्या बाबातचे निमंत्रण व ऐतिहासिक आयोजन करण्याबाबत लवकरच वेगवेगळ्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून नियोजन करण्यात येईल.

संमेलन ऐतिहासिक कसं होईल यासाठी समर्पित भावनेने योगदान देण्याची भुमिका स्वागताध्यक्ष आतंरराष्ट्रीय अनेक पारितोषिके विजेते कुस्ती पटू राजकुमार आघाव आयोजक मल्हारी खेडकर रेणुकाताई वराडे सानप यांनी केले आहे.

🔶 प्रथम संमेलनाचे अध्यक्ष खानदेश रत्न, साहित्य सम्राट, प्रा वा ना आंधळे यांचे दुसऱ्या संमेलनासाठी गौरवोद्गार

समाज बंधू भगिनींनो,सविनय नमस्कार.
व वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याने विविध आघाड्यांच्या माध्यमातून समाज कामी आजवर केलेले कार्य सर्वश्रुत आहे. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री.गणेशजी खाडे व संचालक मंडळ यांच्या या महत्कार्याला समाजातले सहृदयी कदापी विसरणार नाहीत.
द्वितीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन येत्या नोव्हेंबर २०२४ ला अहिल्यानगर येथे संपन्न होत असून समाजातल्या लेखक कवींना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने मिळत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. बंधू भगिनींनो नाशिक येथे २०२२ मध्ये संपन्न झालेले महासंघाचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान मला देऊन जो विश्वास महासंघाने माझ्यावर दाखवला. मी महासंघाचे व सर्व समाज बंधू भगिनी साहित्यिक व श्रोते यांच्या विषयी मनस्वी ऋण व्यक्त करतो , मनापासून धन्यवाद देतो. द्वितीय संमेलन त्याच उत्साहाने आपणा सर्वांच्या सहकार्याने संपन्न व समृद्ध करावयाचे आहे. यासाठी समाज बंधू भगिनींनी सर्वोतोपरी सहकार्य करावे. राष्ट्रसंत भगवान बाबांचा हा रथ यशाच्या दिशेने नेण्यासाठी सारे एकत्र येऊ या. समाजाला भरीव ओळख देऊ या.